ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात असलेल्या स्थानिकांच्या घरावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच घरे पाडण्यात आली. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाडापाडी थांबण्यात आली. मात्र, या कारवाईचे पडसाद आज उमटलेले दिसून आले.
घरे पाडण्यात आलेल्या स्थानिकांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सुळे यांनी माहिती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी सोमवारी सकाळी पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केले. यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनस्थळी जाऊन सुप्रिया सुळे आंदोलकांकडून कारवाईबद्दल आणि कारवाई करताना झालेल्या घडामोडींची माहिती घेतली. घरे पाडण्यात आलेल्या महिलांचे म्हणणे देखील सुप्रिया सुळे यांनी ऐकून घेतले.
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याविरोधातही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. तसेच अजित पवार यांनी पालकमंत्री पदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील करण्यात केली.