- झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे उद्या अलका चौकात आंदोलन
ऑनलाईन टीम / पुणे :
उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी दलित समाजाच्या स्व.मनिषा वाल्मिकी या तरुणीवर ज्या क्रुर पद्धतीने अत्याचार करण्यात आले आणि त्यात तीचा दुर्दवी मृत्यू झाला त्या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे उद्या शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 12.30 वाजता अलका चाैक येथील मुख्य चाैकात ‘योगी सरकार बांगड्या भरो आंदोलन’ करण्यात येणार आहे.
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी सांगितले की, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे शेकडो कार्यकर्ते यावेळी जमणार असून योगी सरकारने घेतलेले झोपेचे सोंग मोडून काढण्याचा प्रयत्न या आंदोलनाद्वारे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.