ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 54 हजार 459 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 92 हजार 65 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 35 हजार 109 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 140 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.15 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 2.71 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 74 हजार 649 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 45 हजार 835 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 27 हजार 59 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 221, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 309 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 108, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 53 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 915 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.40 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 54 हजार 269 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 50 हजार 341 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 928 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 57 हजार 433 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.