ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 1 लाख 27 हजार 529 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 78 हजार 490 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 46 हजार 199 आहे. कोरोनाबाधीत एकुण 4 हजार 762 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 71.4 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 1 लाख 32 हजार 293 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 लाख 712 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 28 हजार 431 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 150 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 76.13 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 53 हजार 96 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 78 हजार 490 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.