ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 16 हजार 372 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 26 हजार 974 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 9 हजार 531 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 588 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.70 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.97 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 22 हजार 135 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 13 हजार 98 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 8 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 414 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.35 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 74 हजार 95 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 71 हजार 155 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 940 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 43 हजार 853 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 26 हजार 974 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.