ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 24 हजार 400 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 40 हजार 242 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 14 हजार 479आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 693 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.63 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.39 टक्के इतके आहे.अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 33 हजार 607 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 20 हजार 485 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 12 हजार 168 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 हजार 356, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 115 व कॅन्टोंन्मेंट 102, खडकी विभागातील 60, ग्रामीण क्षेत्रातील 470, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 65 रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाबाधित एकूण 954 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 530 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.95 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.84 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 21 हजार 185 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 17 हजार 51 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 164 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 76 हजार 440 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 40 हजार 242 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.