ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 25 हजार 507 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 42 हजार 433 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 15 हजार 525 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 743 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.11 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.30 टक्के इतके आहे.अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 35 हजार 528 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 21 हजार 411 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 13 हजार 132 आहे. या मध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 हजार 770, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 636 व कॅन्टोंन्मेंट 91, खडकी विभागातील 60, ग्रामीण क्षेत्रातील 522, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 53 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 985रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मध्ये पुणे महानरगपालिका क्षेत्रातील 796 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 94,पुणे कॅन्टोंमेन्ट 25, खडकी विभागातील 13, ग्रामीण क्षेत्रातील 37, जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील 20 रुगणांचा समावेश आहे.
तसेच 557 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.27 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के इतके आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.