ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 3 हजार 841 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 122 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 904 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 200 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार 604 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 355 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 954 आहे. कोरोनाबाधित एकूण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 193 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 77 हजार 117 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 72 हजार 747 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 370 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 64 हजार 516 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8 हजार 122 जणांचाा अहवाल पॉझिटिव्ह आहे, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.