ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 3 लाख 80 हजार 939 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 54 हजार 970 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 61 हजार 868 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 163 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 83.73 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 95 हजार 251 रुग्णांपैकी 2 लाख 53 हजार 605 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 34 हजार 890 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 85.89 टक्के आहे.
पुणे विभागामध्ये रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 437 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 2 हजार 804, सातारा जिल्हयामध्ये 661, सोलापूर जिल्हयामध्ये 407, सांगली जिल्हयामध्ये 660 व कोल्हापूर जिल्हयात 905 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 8 हजार 866 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 54 हजार 970 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.