ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 38 हजार 584 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 64 हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 24 हजार 444 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 786 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.44 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.91 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, पुणे जिल्हयातील 53 हजार 450 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 32 हजार 975 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 19 हजार 127 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 13 हजार 235 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 41 व पुणे कॅन्टोंन्मेंट 237, खडकी विभागातील 47 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 475, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 92 रुग्णांचा समावेश आहे.
तर पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 999, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 206 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 23, ग्रामीण क्षेत्रातील 62, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 29 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 556 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.69 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.52 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख 15 हजार 298 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 12 हजार 368 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 930 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 46 हजार 730 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.