ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 4 लाख 37 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 86 हजार 388 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 35 हजार 128 इतकी आहे. कोरोनाबाधित एकुण 13 हजार 276 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 90.05 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 14 हजार 462 रुग्णांपैकी 2 लाख 86 हजार 737 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 20 हजार 387 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 338 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.18 टक्के आहे.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 3 हजार 46 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 830, सातारा जिल्हयामध्ये 185, सोलापूर जिल्हयामध्ये 283, सांगली जिल्हयामध्ये 429 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 319 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 19 हजार 967 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 86 हजार 388 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.