ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 4 लाख 41 हजार 652 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 87 हजार 476 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 32 हजार 479 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 345 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.74 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 90.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 15 हजार 11 रुग्णांपैकी 2 लाख 88 हजार 928 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 18 हजार 703 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.72 टक्के आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 88 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 549, सातारा जिल्ह्यात 145, सोलापूर जिल्ह्यात 128, सांगली जिल्ह्यात 215 तर कोल्हापूर जिल्ह्यात 51 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 3 हजार 668 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 191, सातारा जिल्हयामध्ये 726, सोलापूर जिल्हयामध्ये 263, सांगली जिल्हयामध्ये 357 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 131 रुग्णांचा समावेश आहे.