ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 4 लाख 61 हजार 186 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 98 हजार 245 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 23 हजार 190 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 869 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.56 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 20 हजार 661 रुग्णांपैकी 2 लाख 99 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 13 हजार 74 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.53 टक्के आहे.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 331 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 235 ,सातारा जिल्हयामध्ये 525, सोलापूर जिल्हयामध्ये 186, सांगली जिल्हयामध्ये 224 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 161 अशा रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 26 हजार 733 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 98 हजार 245 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.