ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 41 हजार 541 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 70 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 27 हजार 130 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 824 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.76 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.87 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 58 हजार 27 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 36 हजार 27 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 20 हजार 545 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 14 हजार 748, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 813 व पुणे कॅन्टोंन्मेंट 257, खडकी विभागातील 46, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 581, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 100 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 455 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 61, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 236 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 27, ग्रामीण क्षेत्रातील 68, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 34 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 593 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.09 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.51 टक्के इतके आहे.