ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 5 लाख 43 हजार 187 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 66 हजार 289 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 7 हजार 393 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 709 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.92 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 65 हजार 23 रुग्णांपैकी 3 लाख 50 हजार 668 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 5 हजार 592 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.07 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 508 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 327, सातारा जिल्ह्यात 101, सोलापूर जिल्ह्यात 56, सांगली जिल्ह्यात 18 तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 582 आहे. पुणे जिल्हयामध्ये 394, सातारा जिल्हयामध्ये 129, सोलापूर जिल्हयामध्ये 40, सांगली जिल्हयामध्ये 13 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 58 हजार 662 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 66 हजार 289 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.