ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 5 लाख 5 हजार 508 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 35 हजार 760 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 15 हजार 249 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 42 हजार 901 रुग्णांपैकी 3 लाख 23 हजार 220 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 11 हजार 373 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 308 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.26 टक्के आहे.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 192 आहे. पुणे जिल्हयामध्ये 743, सातारा जिल्हयामध्ये 207, सोलापूर जिल्हयामध्ये 145, सांगली जिल्हयामध्ये 42 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 55 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 66 हजार 934 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 35 हजार 760 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.