ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 6 लाख 60 हजार 776 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 48 हजार 161 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 70 हजार 216 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 17 हजार 169 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 88.32 टक्के आहे.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 लाख 19 हजार 600 रुग्णांपैकी 4 लाख 50 हजार 893 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 58 हजार 926 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 781 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.88 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.78 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 6 हजार 197 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 961, सातारा जिल्ह्यात 474, सोलापूर जिल्ह्यात 466, सांगली जिल्ह्यात 205 तर कोल्हापूर जिल्ह्यात 91 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 48 लाख 29 हजार 782 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 7 लाख 48 हजार 161 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.