ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 27 हजार 820 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 39 हजार 885 आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 66.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 1 लाख 264 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 70 हजार 904 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 27 हजार 70 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 70.71 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 55 हजार 967 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 27 हजार 820 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.