ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 08 हजार 571 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 हजार 625 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 04 हजार 431 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.91 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी दिली.
पुणे जिल्हयातील 10 हजार 643 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 06 हजार 682 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 03 हजार 509 आहे. कोरोनाबाधित एकूण 452 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 244 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.78 टक्के आहे.
आत्तापर्यंत विभागामध्ये एकूण 01 लाख 07 हजार 803 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 01 लाख 04 हजार 280 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 03 हजार 503 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 90 हजार 428 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 13 हजार 625 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, असे ही म्हैसकर यांनी यावेळी स्पष्ट केले.