ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 87 हजार 736 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 294 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 40 हजार 155 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 403 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 66.82 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 2 हजार 884 रुग्णांपैकी 73 हजार 509 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 27 हजार 31 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 344 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 71.45 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6लाख 72 हजार 468 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 31 हजार 294 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.