ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 81 हजार 764 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 967 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 38 हजार 961 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 97 हजार 309 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 68 हजार 775 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 26 हजार 303 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 70.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 41 हजार 88 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 23 हजार 967 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.