ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 1 लाख 4 हजार 250 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 745 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 42 हजार 594 इतकी आहे. आतापर्यंत एकूण 3,901 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 69.16 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 15 हजार 128 रुग्णांपैकी 86 हजार 817 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 25 हजार 692 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75.41 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 42 हजार 25 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 50 हजार 745 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.