ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 62 हजार 884 एवढी आहे. त्यामधील 1 लाख 14 हजार 681 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 992 आहे. तर मृतांचा एकूण आकडा 4 हजार 211आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याबाबतची माहिती दिली.
पुणे विभागात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 70.41 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.59 % आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 लाख 22 हजार 397 रुग्णांपैकी 93 हजार 565 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 15 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 817 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 76.44 टक्के आहे.
सातारा जिल्हा : सातारा जिल्हयातील कोरोनाबाधित एकूण 7 हजार 129 रुग्णांपैकी 3 हजार 644 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 226 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 13 हजार 195 रुग्णांपैकी 8 हजार 759 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 844 आहे. कोरोनाबाधित एकूण 592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा : सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 6 हजार 5 रुग्णांपैकी 2 हजार 499 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 14 हजार 158 रुग्णांपैकी 6 हजार 214 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 569 आहे. कोरोनाबाधित एकूण 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत पुणे विभागामध्ये एकूण 7 लाख 93 हजार 4 नमुन्यांची तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 62 हजार 884 नमून्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.