ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरातील आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर असून शहरात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. हे राज्य शासनाचे अपयश असून या गंभीर स्थितीत राज्य शासनाने पुण्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
मुळीक म्हणाले, ‘रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, व्हेंटिलेटर मिळत नाहीत, खासगी रुग्णालयात भरमसाठ बिल आकारणी केली जाते, खासगी प्रयोगशाळांवर नियंत्रण नाही आणि लादलेल्या लॉकडाऊनने काहीच साध्य झाले नाही. उलटपक्षी व्यापारी आणि छोट्या उद्योगांची बसत असलेली घडी विस्कळीत झाली.
तुटपुंजा निधी, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, सापत्न वागणूक, अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुण्याची आरोग्य व्यवस्था बिकट झाली आहे. राज्य शासनानेपुण्याच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मुळीक म्हणाले.