प्रतिनिधी/ सातारा
अगोदरच साताऱयाचा बायोमायनिंग प्रकल्पच अपूर्ण अवस्थेत आहे. नेचर नीड या संस्थेकडे मेडिकल वेस्ट कचऱयाचे वर्गीकरण करुन त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आहे. परंतु सध्याच्या कोरोनाच्या काळात पुणे महानगरपालिकेचा कचरा साताऱयात आणला जातोच कसा?, सातारकरांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असून त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सातारा शहरात अगोदरच बायोमेडिकल वेस्ट गोळा केले जाते आणि ते कचरा डेपोत कसेही टाकले जाते त्यावर पालिकेकडून कोणतेही निर्बंध ठेवले जात नाहीत. असे असताना सध्या कोरोनाच्या काळात चांगलाच सातारा शहर थोडेसे कोरोनापासून बाजूला असताना पुण्यात कोरोनाचा कहर सुरु आहेत. तेथील महानगपालिका क्षेत्रातून जवळपास असणाऱया पिंपरी महानगरपालिका असेल बारामती नगरपालिका असेल या नगरपालिका क्षेत्रात बायोमायनिंग प्रोजेक्ट आहेत. तरीसुद्दा साताऱयाकडे पुणे नगरपालिकेच्या हद्दीतील मेडिकल वेस्ट आलेच कसे?, मेडिकल वेस्ट डिस्पोज करण्यासाठी प्रत्येक किलोमागे सव्वाशे रुपये भेटतात असे सांगण्यात येते. त्यामुळे सातारकरांच्या जीवाशी खेळून कचरा सोनगाव कचरा डेपोत कसा काय?, पालिकेने त्यावर का चाफ लावला नाही. विद्यमान आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनाही या घटनेची काहीच माहिती नाही. त्यांना या बाबी घडत असताना अंधारात ठेवले जात आहे काय?, असे अनेक प्रश्न साताकर विचारु लागले आहेत.
पुण्यातून आजार मागवण्याची यंत्रणा काम करते
तो पुण्यातला सातारच्या कचरा डेपोत येतो. सर्वसामान्य कष्टकरी वर्गच कचऱयावर प्रक्रिया करण्याचे काम करतो. तो कचरा कोणत्या रुग्णाचा आहे हे समजत नाही. कचरा डेपोत काम करणारा कर्मचारी साताऱयात फिरणार मग सातारा शहरातल्या नागरिकांना त्रास होणार. यंत्रणा पुण्यातून आजार मागवण्याचे काम करते. ते थांबवावे, अशी प्रतिक्रिया सर्व श्रमिक कचरा वेचक संघाचे प्रकाश भिसे यांनी दिली.