वृत्तसंस्था/ सातारा
महेंद्र चव्हाण गेल्याच आशिया श्री स्पर्धेत त्याने सुवर्ण जिंकले होते. जागतिक स्पर्धेतही सुवर्ण पदकाचे त्याने चुंबन घेतले होते. एवढेच नव्हे तर त्याने महाराष्ट्र श्री” स्पर्धेतही चार वेळा सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता, पण महाराष्ट्र श्री स्पर्धेत चॅम्पयिन ऑफ चॅम्पियन्सचे बहुमान त्याला वारंवार हुलकावणी देत होते. गेल्या दीड दशकापासून पुण्याच्या महेंद्र चव्हाणने घेतलेल्या परिश्रमाचे अखेर आज चीज झाले. त्याने मुंबईच्या अनिल बिलावाचे कडवे आव्हान मोडीत काढीत 17 व्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्मयपद शरीरसौ÷व स्पर्धेवर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. या राज्य अजिंक्मयपद स्पर्धेत मुंबईने आपला दबदबा कायम राखताना सांघिक विजेतेपद आणि उपविजेतेपदही पटकावले. महिलांच्या शरीरसौ÷व स्पर्धेत मुंबईच्या अमला ब्रम्हचारीने सलग दुसऱयांदा मिस महाराष्ट हा मानाचा पुरस्कार पटकावला तर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात उपनगरची दिपाली ओगले मिस महाराष्ट्र ठरली.
महाराष्ट्र श्रीचा अंतिम थरार याची देही याची डोळा पाहण्यासाठी तालीम संघ मैदान खचाखच भरले होते. तब्बल दहा हजार क्रीडाप्रेमींच्या साक्षीने पुण्याच्या महेंद्र चव्हाणने महाराष्ट्र श्रीचे द्वंद्व जिंकले. विविध गटातून आलेल्या दहा गटविजेत्यांमध्ये चॅम्पयिन ऑफ चॅम्पयिन्ससाठी सात सर्वसामान्य पोझेस झाल्या. त्या होताच जजेसनी कंपेरिझनसाठी पुणेकर महेंद्र चव्हाण आणि मुंबईकर अनिल बिलावा यांना बोलावले. दोघांच्या पोझेस सुरू असताना शेकडो क्रीडाप्रेमींचा आवाज महेंद्रच्या बाजूने घुमत होता तर त्याच्या तोडीस तोड उत्तर मुंबईकर चाहते अनिल बिलावाच्या बाजूने देत होते. एकीकडून महेंद्र तर दुसरीकडून बिलावासाठी प्रेक्षक आवाज देत होते, तेव्हाच जजेसनी आपला अत्यंत अवघड कौल महेंद्र चव्हाणच्या बाजूने दिला. या थरारक स्पर्धेचा पुरस्कार सोहळा भारत विकास ग्रूपचे (बीवीजी) सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड, जागतिक शरीरसौ÷व महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौ÷व संघटनेचे अध्यक्ष प्रशांतराव आपटे, सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे, उपाध्यक्ष राजेश सावंत, कोषाध्यक्ष शरद मारणे, अजय खानविलकर, स्थानिक नगरसेविका सिद्धी पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
कांबळे- गुप्तामध्ये काँटे की टक्कर
मुंबई उपनगरच्या नितेश कोळेकर आणि नितीन शिगवण यांच्यावर कुरघोडी करत पुण्याच्या अवधुत निगडेने 55 किलो वजनी गटात बाजी मारली. 60 किलो गटात उपनगरचेच देवचंद गावडे आणि प्रितेश गमरे पश्चिम ठाण्याच्या नितीन म्हात्रेचे वर्चस्व मोडून काढण्यात अपयशी ठरले. 65 किलो वजनी गटात ठाणेकर दिनेश कांबळे आणि मुंबईकर उमेश गुप्ता यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघेही एकास एक होते. पण शेवटी दिनेशचा अनुभव अव्वल ठरला. पुढच्या गटात पुण्याच्या तौसिफ मोमीनने पालघरच्या रोशन नाईकला पछाडले तर 75 किलोच्या गटात ठाण्याचा सुदर्शन खेडेकर नवी मुंबईच्या सतीश यादवपेक्षा किंचीत सरस ठरला.
80 किलो वजनी गटात मुंबईच्या अनिल बिलावाचे गटविजेतेपद निश्चित होते. त्याच्या तोडीचा एकही खेळाडू या गटात नव्हता. उपनगरचाच भास्कर कांबळे दुसरा आला तर पुण्याच्या राजू भडाळेला तिसरा क्रमांक मिळाला. मुंबई श्री” विजेत्या रसल दिब्रिटोने 90 किलोमध्ये सहज बाजी मारली तर 100 किलो वजनी गटात अपेक्षेप्रमाणे महेंद्र चव्हाण अव्वल आला.
मुंबई आणि उपनगरचेच वर्चस्व
यंदाही महाराष्ट्र श्रीवर मुंबईचेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट होते. 12 गटांपैकी सहा गटात मुंबईकर खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. तीन सुवर्णासह सहा रौप्य आणि दोन कांस्य पदक पटकावणारा मुंबई उपनगरचा संघ 300 गुणांसह सांघिक विजेता ठरला तर तीन सुवर्ण आणि तीन रौप्य जिंकणारा मुंबईचा संघ सांघिक उपविजेता ठरला. तसेच ठाण्याने तीन तर पश्चिम ठाण्याने एक सुवर्ण जिंकून चमकदार कामगिरी केली. पुण्याला दोन तर कोल्हापूरला एका गटात विजेतेपद संपादता आले. पुण्याचा तौसिफ मोमीन सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू ठरला. येत्या 19 ते 22 मार्चला इंदूर येथे होणाऱया भारत श्री स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱया राज्याच्या संघात मुंबईसह ठाणे, पुणे आणि कोल्हापूरची ताकद दिसून येईल.
सांघिक उपविजेतेपद : मुंबई (250 गुण )
सांघिक विजेतेपद : मुंबई उपनगर (300 गुण)
सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू : तौसिफ मोमीन ( पुणे)
महाराष्ट्र श्री उपविजेता : अनिल बिलावा (मुंबई)
महाराष्ट्र श्री किताब विजेता : महेंद्र चव्हाण (पुणे)
अमला आणि दिपाली मिस महाराष्ट्र.
महिला गटातही आमला, दिपाली ओगलेची बाजी
महिलांच्या शरीरसौ÷व स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या अमला ब्रम्हचारीचाच दबदबा दिसला. तिने शरीरसौ÷व गटात सर्वोत्तम प्रदर्शन करताना मिस महाराष्ट्रचे जेतेपद कायम राखले. गतवषीही अमलाने हा किताब जिंकला होता. या गटात उपस्थित एकही खेळाडू तिला आव्हान देऊ शकली नाही. तसेच महिलांच्या फिजीक स्पोर्टस प्रकारात मुंबई उपनगरच्या दिपाली ओगलेने बाजी मारली. नुकत्याच झालेल्या मुंबई श्री स्पर्धेच्या फिजीक स्पोर्टस प्रकारात तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते तर या स्पर्धेत तिने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर मिस महाराष्ट्रचा निकाल बदलण्याची करामात करून दाखवली. मुंबई श्री स्पर्धेतील विजेत्या रेणूका मुदलियारवर मात करीत दिपालीने आपले जेतेपदाचे स्वप्न साकार केले. गेल्यावषी ती या स्पर्धेत उपविजेती ठरली होती. पुण्याची अदिती बंब तिसरी आली. या दोन्ही गटात सहभागी झालेल्या सर्व महिला खेळाडूंची आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.