ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉन बाबत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, ओमिक्रॉनपासून घाबरण्याचं कारण नसून मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांकडून करण्यात आलं होतं. देशात काही ठिकाणी ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले होतं. याच दरम्यान आता एक सकारात्मकम माहिती समोर आली आहे. पुण्यातील रुग्ण ओमिक्रॉन बरा झाला आहे.
पुण्यातील ओमायक्रॉन ग्रस्त एक व्यक्ती दहाव्या दिवशी निगेटिव्ह आली आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या जयपूरमध्ये सापडलेल्या ९ जणांचे रिपोर्ट्सही आता निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णांना जयपूरच्या RUHS रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. परंतु त्यांना आता सात दिवस होम क्वारंटाइन राहावं लागेल. राज्याच्या आरोग्य विभागानुसार सर्व नऊ रुग्ण हे तंदुरुस्त असून त्यांच्यात कोणतीही लक्षण नाही. त्यांचं सिटी स्कॅन आणि अन्य चाचण्याही सामान्य आहेत.