ऑनलाईन टीम / पुणे :
शहरात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच शनिवारी 244 नवे कोरोना रूग्ण आढळून आले. तर 261 जण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात शहरात 9 जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला. तर पुण्याबाहेरील 4 जणांनी आपला जीव गमावला. दैनंदिन मृतांची सख्येत होणारी वाढ देखील चिंताजनक आहे.
दरम्यान, पुणे महापालिका क्षेत्रात विविध कोविड सेंटर, खाजगी लॅब, रूग्णालये आणि रॅपिड ऍण्टिजेन किटद्वारे दिवसभरात 9 हजार 312 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी 3 टक्के इतकी आहे. शहरात आजपर्यंत चार लाख 94 हजार 968 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून, त्यातील चार लाख 83 हजार 767 जण बरे झाले आहेत.
- 2,289 रूग्णांवर उपचार सुरू
सध्या शहरातील एकूण ऍक्टिव्ह रूग्णसंख्या 2 हजार 289 वर आली आहे. तसेच 208 गंभीर रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 279 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ हजार 912 इतकी झाली आहे.