- पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
ऑनलाईन टीम / पुणे :
प्रसिद्ध उद्योजक बेपत्ता झाल्यामुळे पुण्यात एकच मोठी खळबळ उडाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळख असलेले गौतम पाषाणकर बुधवारी संध्याकााळी साडे चार वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
पाषणकर हे बुधवारी दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचे सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी देखील अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. या प्रकरणी सध्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
तपासा दरम्यान, गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. त्यामध्ये सुसाईड नोट होती. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.