ऑनलाईन टीम / पुणे :
देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, BCGG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कोविशील्ड लस तयार करणारा भाग सुरक्षित असून कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती मिळत आहे.