ऑनलाईन टीम / पुणे :
लॉकडाऊनमुळे पुण्याच्या वेगवेगळ्या भागात अडकलेल्या उत्तरप्रदेशातील 1131 नागरिकांना घेऊन पुण्यातून विशेष ट्रेन शनिवारी रात्री लखनऊला रवाना झाली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली.
नवल किशोर राम म्हणाले, पुण्यातील वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या उत्तरप्रदेशातील 1131 नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ट्रेनमध्ये बसवण्यात आले. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून, प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करण्यात आली. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. याशिवाय सोबत खाद्यपदार्थही देण्यात आले आहे.
राज्यशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम व उत्तर प्रदेश प्रशासनाच्या समन्वयातून पुणे जिल्ह्यातून उत्तर प्रदेशात सोडण्यात आलेली ही पहिलीच रेल्वे आहे.