ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात आज सकाळपासून दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या आता 40 वर पोहचली आहे. तर आज नवीन 44 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
भवानी पेठेत राहणाऱ्या एका 73 वर्षीय वृद्धाला 13 एप्रिलला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना किडनीचाही आजार होता. आज त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
तर एका 34 वर्षीय तरुणाला मधुमेहाने ग्रासले होते. त्याला लठ्ठपणाचाही त्रास होता. काल त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह होती. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.