पुणे / प्रतिनिधी :
सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताद्वी महोत्सव समिती व झाशीची राणी प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज (शुक्रवार) महिला मुक्ती परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘सम्यक गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती जन्मशताद्वी महोत्सव समितीचे संयोजक नागेश भारत भोसले यांनी ही माहिती दिली.
पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. शारदा वाडेकर असणार आहेत. अंकल (यादवराव) सोनवणे ,वसंतराव साळवे, यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. माजी नगरसेविका, झाशीची राणी प्रतिष्ठान ट्रस्टच्या संस्थापक ऍड. रूपाली पाटील-ठोंबरे या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत.
सुनिती सु. र. यांना ‘सम्यक पुरस्कार’
सामाजिक क्षेत्रातील सुनिती सु. र., लता राजगुरु, ऍड. नीलिमा वर्तक, सुमन मोरे, सुमन गायकवाड, कावेरी जाधव, नीता अडसुळे, मोहिनी कारंडे, मनिषा जाधव, रुक्साना शेख, रेखा चौरे यांना सम्यक गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.