पुणे / प्रतिनिधी :
कोरोनामुळे पुण्यातील आणखी एका 46 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील हा दुसरा बळी आहे.
पुण्यातील या महिलेला दोन दिवसांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यामध्ये न्यूमोनियाची लक्षणे होती. या महिलेचा कोरोना अहवाल आजच पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असतानाच आज तिचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणेकरांची धास्ती वाढली आहे. दुसऱया बाजूला कोरोनाची बाधा झालेल्या आजोबांकडून तीन वर्षीय चिमुकलीला कोरोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 50 च्या जवळपास पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेली अंगणवाडीसेविका यातून मुक्त झाली आहे. या महिलेला नेमकी कशी बाधा झाली, हे कळू शकले नाही.
दरम्यान, आज जळगावातही एका कोरोनाबधिताचा मृत्यू झाला आहे. या रूग्णाचा अहवाल काल पाॅझिटिव्ह आला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी याबाबतची दिली आहे.