ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात आज दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींची संख्या आता 31 वर पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील संगमवाडी परिसरातील 58 वर्षीय महिलेला 9 एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेला यापुर्वी लठ्ठपणा, स्लिप अपनिया आणि रक्तदाब असे आजार होते. आज सकाळी या महिलेचा मृत्यू झाला.
तर सोमवार पेठ परिसरात राहणारी दुसरी 56 वर्षीय महिला 5 एप्रिलला ससूनमध्ये दाखल झाली होती. तिला कोरोनाचा संसर्ग झाला होता. तिला रक्तदाबाचाही त्रास होता. आज सकाळी तिचे अवयव निकामी होऊन तिचा मृत्यू झाला.