ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील ससून रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेची आज यशस्वी प्रसूती झाली. बाळ आणि बाळाची आई सुखरूप असून, बाळ कोरोनामुक्त असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
ससून रुग्णालयात एका २५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेने एका बाळाला जन्म दिला असून, बाळाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. बाळाचे वजन ३.५ किलो आहे तर आई कोरोनाबाधित असल्याने बाळावर पुढचे काही दिवस नवजात शिशुकक्षात उपचार होणार आहेत. बाळाची तब्येत उत्तम असून, डॉक्टर आणि नर्स या बाळाची काळजी घेत आहेत, असे मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.