ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे-बेंगळूर महामार्गावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील ट्रकने आठ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात 4 चारचाकी वाहने आणि 3 रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. काही जण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी पुण्यातील नवले ब्रीजजवळ हा अपघात झाला.
सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताराकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ट्रक (डी डी 01 सी 0467) चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील 8 वाहनांना धडक दिली. यात 4 चारचाकी आणि 3 रिक्षांचे मोठे नुकसान झाले. तर काही जण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सिंहगडरोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. या अपघातामुळे महामार्गावर बराव वेळ वाहतूक कोंडी झाली होती.