ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील कात्रज – देहुरोड रोडवरील नर्हे आंबेगावच्या पेट्रोल पंपासमोर आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्किड स्कूल समोर हा अपघात झाला. कात्रज नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक माल ट्रक जात असताना चकलाचे नियंत्रण सुटल्याने हा माल ट्रक पुढील दहा ते पंधरा वाहनांवर जावून आढळला. ही धडक इतकी पुढील वाहने एकमेकांवर धडकत गेली.
या अपघातामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून, स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर क्रेनच्या साहाय्याने गाड्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.