ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात मागील 12 तासात 55 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1319 वर पोहचली असून, 77 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
रविवारी दिवसभरात पुण्यात 80 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1264 वर पोहचली होती. त्यांनंतर पुण्यात रात्रभरात 55 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1319 वर पोहचली आहे. पुणे जिल्ह्यातील 206 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे.