रशियाने युपेनवर केलेल्या आक्रमणाला आता 325 दिवस होत आहेत. पंधरा दिवसात युपेनचा पाडाव करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या रशियन सैन्याला अद्यापही येथे म्हणावे तसे यश आलेले नाही. उलट अनेक ठिकाणी या सैन्याला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन अत्यंत अस्वस्थ असून त्यांना निराशेने घेरल्याचे बोलले जात आहे.
जगात सध्या पुतिन यांच्यानंतर कोण, या प्रश्नावर जोरदार चर्चा होत आहे. पुतिन यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून प्रियोजीन येवगेनी यांची नियुक्ती केल्याचीही चर्चा आहे. येवगेनी हे पूर्वी स्वयंपाक्मयाचे काम करीत असत. याच कामातून त्यांची पुतिन यांच्याशी प्रथम ओळख आणि नंतर घनि÷ मैत्री झाली. ही मैत्री इतक्मया पातळीपर्यंत पोहोचली की येवगेनी यांचा समावेश पुतिन यांच्या खासगी वर्तुळात झाला. नंतर त्यांनी पुतिन यांच्या सल्लागाराची भूमिकाही साकारण्यास प्रारंभ केला. हल्ला करून युपेन ताब्यात घेण्याची कल्पना त्यांचीच होती, असेही बोलले जाते. पुतिन यांच्या सर्व नजीकच्या सहकाऱयांमध्ये आता येवगेनी यांचे स्थान सर्वोच्च असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुतिन यांनी पदत्याग केलाच तर त्यांच्या जागेवर येवगेनी यांचीच नियुक्ती होईल, असे निश्चितपणे मानले जात आहे. येवगेनी हे आता युद्धविराम करण्याच्या बाजूचे असल्याचेही सांगितले जात आहे. युद्ध लांबविल्याबद्दल त्यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोयुबू यांची जाहीररीत्या निर्भर्त्सना केली आहे. त्यामुळे येवगेनी यांनी लवकर पुतिन यांची जागा घ्यावी आणि युद्ध एकदाचे थांबवावे, अशी अपेक्षा पाश्चिमात्य देशही करीत आहेत.