पुन्हा होणार पंतप्रधान
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांनी रविवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळविल्याचा आणि चौथ्या कार्यकाळासाठी जनमत प्राप्त झाल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान ओर्बन यांना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा मोठा समर्थक मानले जाते.
हा आमच्या पक्षासाठी एक मोठा विजय असल्याने ओर्बन यांनी बुडापेस्ट येथे पक्षाचे पदाधिकारी तसेच समर्थकांना संबोधित करताना म्हटले आहे. लोकशाही कमकुवत करणे आणि कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर लक्ष न देण्याप्रकरणी ओर्बन यांच्यावर युरोपीय महासंघाकडून टीका केली जाते.
हंगेरीत ओर्बन यांच्या ‘फाइड्ज पार्टी’ निवडणुकीत बहुमत मिळाले आहे. सुमारे 91 टक्के मतमोजणीमध्ये ओर्बन यांच्या फाइड्ज पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीला 53 टक्के मते मिळाली आहेत. तर युरोपीय समर्थक विरोधी आघडी ‘युनायटेड फॉर हंगेरी’ला 34 टक्क्यांहून अधिक मते प्राप्त झाली आहेत.