ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया-युक्रेन युद्ध महिनाभरापासून सुरूच आहे. युक्रेनसोबत युद्ध सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना मोठा धक्का बसला आहे. युक्रेनवर आक्रमण केल्याने नाराज असलेल्या रशियन हवामान दूताने पायउतार होत देश सोडला आहे. पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने अॅंटोली चुबाइस (Anatoly Chubais) नाराज असल्याचं या घडामोडीशी संबंधित दोघांनी सांगितलं आहे. ब्लूमबर्ग न्यूजने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने देश सोडल्याने रशियासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. ६६ वर्षीय चुबाइस हे १९९० च्या दशकातील काही आर्थिक सुधारकांपैकी एक असून पुतीन यांच्या सरकारमध्ये राहिले होते. त्यांनी पाश्चात्य देशांसोबत चांगले संबंध ठेवले होते. क्रेमलिनचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी यासंदर्भात अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही.
दरम्यान, युक्रेनवर आक्रमण केल्याने नाराज असलेल्या रशियन दूत तसेच पुतिन यांचे सल्लागार चुबाइस यांनी पायउतार होत देश सोडला आहे. पुतीन यांनी युक्रेनबरोबर युद्ध पुकारल्याने चुबाइस नाराज असल्याचे या घडामोडीशी संबंधित दोघांनी सांगितलं आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने देश सोडल्याने रशियासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे.
चुबाइस हे रशियातील खासगीकरणाच्या धोरणाचे शिल्पकार समजले जातात. चुबाइस यांच्या मार्गदर्शनात पुतीन यांनी काम केले आहे. १९९० च्या दशकाच्या अखेरपर्यंत पुतीन यांनी त्यांचा प्रभाव वाढवला आणि रशियन सत्ताकारण प्रवेश केला. त्यावेळीही चुबाइस यांची भूमिका महत्त्वाची होती. ६६ वर्षीय असलेले चुबाइस हे १९९० च्या दशकातील काही आर्थिक सुधारकांपैकी एक असून पुतीन यांच्या सरकारमध्ये राहिले होते. त्यांनी पाश्चात्य देशांसोबत चांगले संबंध ठेवले होते. क्रेमलिनचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.