वार्ताहर / कुंभोज
दुर्गेवाडी तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार फंडा बरोबरच शासन दरबारी पुनर्वसित जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना दुर्गेवाडी ग्रामस्थांना देण्यासाठी आपण लागेल ते सहकार्य करू, परिणामी आपल्याला पाणी देण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या घरादारावर पाणी सोडले अशा पुनर्वसित लोकांना सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे व त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे गौरवोद्गार आमदार राजु बाबा आवळे यांनी काढले.
दुर्गेवाडी येथे मुस्लिम दफनभूमी (कब्रस्तान) सैरक्षण भिंत बांधकामाचे उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी ग्रामपंचायत दुर्गेवाडी व दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या वतीने तसेच मुस्लिम समाज दुर्गेवाडी यांच्या वतीने आमदार राजीवहोते यावेळी ग्रामपंचायत दुर्गेवाडी व दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या वतीने तसेच मुस्लिम समाज दुर्गेवाडी यांच्या वतीने आमदार राजु आवळे यांचा सत्कार करण्यात आला.
या उद्घाटन प्रसंगी एम.एच. मुल्ला(ग्रामसेवक), सादिक वारूणकर माजी उपसरपंच) अजय घोलप(माजी उपसरपंच) जहाँगिर हजरत (माजी उपसरपंच कुंभोज) आनंदा घोलप, सुनिल पाटिल, समीर वारूणकर, सोहेल, सलिमवारूणकर.शमशुद्दीन वारूणकर,चाँद पटेल,शाहिद वारूणकर,आयुब पटेल ,महंमद पटेल,हाफिज पटेल ,मुस्तफा, जुबेर पटेल,मोसिन पटेल, सल्लाउद्दीन वारूणकर,मुबारक वारूणकर,सदानंद महापुरे, धनाजी तिवडे,सुदर्शन कांबळे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.