31 जण कोरोनाग्रस्त, पाच ठिकाणी नाकाबंदी : डय़ुटीवरीवल पोलीसांना घरी जाण्यास प्रतिबंध : अपुऱया कर्मचाऱयासह लॉकडाऊनची जबाबदारी
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा पोलीस स्थानकात कोरोनाबाधित झालेल्या प्रंटलाईन वॉरिअर्सचा आकडा एकूण 31 वर पोचला आहे. सुमारे 29 जणांना कोविड केअर सेंटरच्या उपचारानंतर घरी रवानगी केलेली आहे. काल बुधवारी कुर्टी येथील हवालदार व वाळपई येथील पोलीस कॉन्स्टेबल पॉझिटीव्ह सापडले, सद्यपरिस्थितीत कोविड केअर सेंटरमध्ये फक्त 3 जण उपचार घेत आहेत. फोंडा पोलीस स्थानकावर डय़ुटी बजावणाऱया पोलिसांना डय़ुटीवरून सुटल्यानंतर घरी जाण्यावर प्रतिबंध घालण्यात आल्याचे सक्त ताकिद देण्यात आले आहे. मात्र यावेळी घरापासून दूर राहण्याची समांतर व्यवस्था चोख पद्धतीने न केल्याने डय़ुटीवरील पोलीस हिरमुसलेले आहेत. अगोदरच कोरोनाने हैराण झालेल्या फोंडा पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी पुनश्च लॉकडाऊनमुळे डोक्याला ताप वाढणार आहे.
राज्य सरकारने पुनश्च लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर फोंडा पोलीस स्थानकावर डय़ुटी बजावणाऱया अपुऱया कर्मचाऱयावर ताण वाढण्याची शक्यता आहे. तसेच डय़ुटीवरून सुटी झाल्यानंतर कुठे रहावे हा यक्षप्रश्न उभा राहिलेला आहे. नागेशी येथील बांदोडकर सभागृहात सगळय़ासाठी एकत्रित सोय करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे, मात्र याठिकाणी इतर कोणत्याच सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहेत. डय़ुटीवरून सुटल्यानंतर आपल्या सुरक्षितेसाठी तसेच खबरदारी म्हणून गरम पाणी, विलगीकरणासाठी वेगळा रूम अशी कोणतीच व्यवस्था नाही.सरकारने प्रंटलाईन वॉरिअर्ससाठी नजीकच्या ठिकाणी बंद असलेल्या हॉटेलवर सोय करणे गरजेचे आहे.
मागीलवेळी पाच ठिकाणी नाकाबंदी, यंदा पोलीसांची कमतरता
फेंडय़ात मागील लॉकडाऊनच्या काळात एकूण पाच ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. फोंडा शहरात तिस्क फोंडा, नागा मशिद, फर्मागुडी, वरचा बाजार व दत्तगड-बेतोडा अशा पाच ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळेच्या परिस्थितीत 31 पालीस कोरोनाग्रस्त असल्याने आणखी ताण वाढणार आहे. 29 जणांना 21 दिवसांच्या होम क्वारंन्टाईनचा अवधी पुर्ण झाल्यानंतर कामावर रूजू होण्याचे आदेश असल्यामुळे डय़ुटी बजावणाऱया पोलिसांच्या चिंतेत आणखी भर पडलेली आहे. फोंडा तालुक्यात एकूण 8 आऊट पोस्ट, रोबोट वाहनावर, पोलीस स्थनाकात कचेरीतील काम, त्याव्यक्तीरित एसएचओ म्हणून हवालदार, न्यायालयातील सेवा पोलीस, उपजिल्हा इस्पितळात तसेच फर्मागुडी टुरीस्ट रेसिडेन्सी अशा ठिकाणी मिळून सुमारे शंभराहून जास्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कोरोना लॉकडाऊन काळात नाकाबंदी व इतर ठिकाणी व्यवस्था पुरविण्य़ासाठी कर्मचारी अपुरे पडून जादा पोलिसांची आवश्यकता भासणार आहे.
पोलीस निरीक्षक हरीष मडकईकर होम क्वारंन्टाईन असल्यामुळे तात्पुरता ताबा वाळपईचे निरीक्षकाकडे आहे. दोन्ही पोलीस स्थानकाचा कार्यभार निरीक्षकांना सांभाळावा लागणार आहे. पोलीस कर्मचाऱयांना वाळपईहून फोंडय़ात येण्यासाठी बंदी मात्र एकच पोलीस निरीक्षक दोन्ही ठिकाणी असाही प्रश्न काही पोलिसांना सतावत आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षकांसह चार उपनिरीक्षक कोरोनाबाधित झालेले आहेत.
दोन शिकाऊ उपनिरीक्षक, निरीक्षक डबल चार्ज पोलीस स्थानकात 1 जुलै रोजी पहिला कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. दहा दिवस कोविड केअर सेंटरतून 21 दिवस घरी होम क्वारंन्टाईन करावे लागल्याने फोंडा पोलीस स्थानकाला सद्यपरिस्थितीत 4 उपनिरीक्षकसह कार्यभार हाताळावा लागत आहे. त्यापैकी दोघेजण शिकाऊ उपनिरीक्षक असून एक महिला उपनिरीक्षक आहे. पोलीस निरीक्षकालाही दोन पोलीस स्थनाकासह डबल चार्ज अशी अवस्था झालेली आहे. कोरोनाशी झुंज देणाऱया प्रंटलाईक वॉरीअर्सच्या आरोग्याच्या दृष्टीकडे सरकारने लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.