प्रतिनिधी / बेळगाव
जात, भेद आणि कोणताही धर्म न मानता फक्त माणुसकीच्या नात्याने अंजुमन ए इस्लाम ही संस्था कार्य करते. कोरोना विषाणूचे संक्रमण ज्या काळात अधिक तीव्र होते, त्या काळात ही संस्था रात्रंदिवस कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी झटत होती. आता शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ही संस्था पुन्हा एकदा रुग्णांना सेवा देण्यास सज्ज झाली आहे.
फक्त माणुसकीच्या नात्याने आणि जनसेवा करण्याच्या हेतूने ही संस्था 24X7 तास काम करते. कोरोना काळात उपचारांअभावी अनेकांचा मृत्यू झाला, तर काही ठिकाणी रुग्णालयाच्या असुविधांचा फटका रुग्णांना बसला. ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. या समस्येतून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी अंजुमन ए इस्लाम संस्थेने ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा केला आणि मोफत आरोग्य शिबिर राबवून रुग्णांना मोफत गोळय़ा-औषध मिळवून दिले. येणाऱया पुढील काळात कोरोनाचा धोका ओळखून आपले अविरत कार्य सुरू ठेऊन पुन्हा एकदा सेवा देण्यास ही संस्था सरसावली आहे.
त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर्स आणि मेडिकल सेवा उपलब्ध होण्यासाठी अश्पाक घोरी 9916899250, अमीन पट्टेकरी 7676513526, अब्दुल गफारशेख 8971324786, फहीम नाईकवाडी 9986796600, अमजद मोमीन 9886095522, बाबुलाल मुजावर 9611852676 या टीमशी आणि ऑक्सिजन सिलिंडर्ससाठी 9108724777 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माणुसकीचे नाते जपणार : राजू सेठ शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. येणाऱया पुढील काळात कोरोनाची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे अंजुमन ए इस्लाम ही संस्था रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा करण्यास सज्ज झाली असून मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करणार आहे. कोणताही धर्म न पाहता फक्त माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचा अंजुमनचा हेतू असून माणुसकी हा धर्म गाठायचा आहे, असे राजू सेठ म्हणाले.