इम्तियाज अली तयार करत आहेत बायोपिक
गायक अमिर सिंह चमकीला यांच्या बायोपिकमुळे दिग्दर्शक इम्तियाज अली सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी इम्तियाजने रणबीर कपूर किंवा आयुष्मान खुराना यांचा विचार चालविला असल्याचे समजते. पण अमर सिंह यांचे पुत्र जयमान यांनी या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखांसाठी स्वतःची पसंती जाहीर केली आहे.
चित्रपटात माझ्या आईवडिलांच्या भूमिकेत कार्तिक आर्यन आणि सारा अली खान दिसून यावेत असे जयमानने म्हटले आहे. जयमान यांनी या बायोपिककरता अनुमती दिली आहे. कार्तिक आर्यन रेखाचित्रांमध्ये पूर्णपणे माझ्या वडिलांसारखा दिसत होता असेही जयमान यांनी नमूद केले आहे.
अमर सिंह चमकीला हे पंजाबी गायक, गीतकार, संगीत दिग्दर्शक होते. चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत यांच्यासह त्यांच्या बँडच्या 2 सदस्यांची 8 मार्च 1988 मध्ये हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या का करण्यात आली हे अद्याप समजू शकेल नाही. अमर सिंह यांच्या गाण्यांना त्या काळात मोठी लोकप्रियता मिळाली होती.