साहित्य : 1 वाटी चणाडाळ, 1 वाटी किसलेला गूळ, एक वाटी मैदा, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, 7 ते 8 चमचे तेल, 1 चमचा वेलचीपूड, कोरडे तांदळाचे पीठ
कृती : चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवावी. डाळ शिजली की त्यातील पाणी निथळावे. याची कटाची आमटी करता येते. निथळलेली डाळ पातेल्यात काढावी. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना मिश्रण ढवळत राहावे. नाहीतर पातेल्याला लागून करपू शकते. पुरणात वेलचीपूड घालावी. मिश्रण घट्टसर झाले की आच बंद करावी. मिश्रण पुरण यंत्रातून फिरवावे. मैदा व कणिक मिक्स करून त्यात 5-6 चमचे तेल घालून सैलसर मळावे. भिजवलेले पीठ 2 तास मुरू द्यावे. पुरणाचे गोळे बनवावेत. मैद्याचा छोटा गोळा करून त्याची पारी बनवावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून पोळपाटावर तांदळाची पिठी घेऊन हलक्मया हाताने पोळी लाटावी. तव्यावर खरपूस भाजावी. साजूक तूप घालून गरम गरम खाण्यास द्यावी. थंड पोळी दूधासोबत छान लागते.
टीप : वेलचीऐवजी जायफळपूडही वापरू शकता. त्याचा स्वादही चांगला येतो.