लोक स्वतःहून देतात पैसे
कुणी स्वतःचा अपमान करविण्यासाठी स्वतःच पैसे देत असल्याचे कधीच ऐकले आहे का? सर्वसाधारणपणे लोकांना सन्मान पसंत असतो, अनेकदा इतरांकडून सन्मान मिळविण्याची धडपड केली जात असते. परंतु एका महिलेला लोक स्वतःचा अपमान करवून घेण्यासाठी पैसे देतात. ही महिला देखील चारचौघात संबंधिताचा अपमान करत असते. हे काम अजब वाटत असले तरीही महिलेला आता याची सवय झाली आहे.
कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिस येथे राहणारी 27 वर्षीय मॉनिक डी सेड एक डॉमिनेट्रिक्स आहे. पुरुष तिची ही अजब सेवा मिळवू पाहतात. स्वतःसोबत रेस्टॉरंट किंवा अन्य ठिकाणी नेतात, मग सार्वजनिक ठिकाणी मोनिक त्यांचा अपमान करते, त्यांच्याबद्दल अपशब्द उच्चारते. स्वतःच्या क्लायंट्ससोबत डिनरवर गेल्यास मॉनिकला मॅम किंवा मिस्ट्रेस म्हणावे लागते. तसेच कारमधून उतरताना तिच्यासाठी दरवाजा देखील उघडावा लागतो. डिनरवेळी मॉनिकच्या ग्लासमधील पाणी कदापिही संपू नये याची खबरदारी पुरुषांना घ्यावी लागते. अनेकदा मॉनिक तर पुरुषांच्या गळय़ात पट्टा बांधून त्यांना फिरवते.
मॉनिकला अलिकडे सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात ट्रोल केले जात होते. यानंतर तिने लोकांना स्पष्टीकरण देत हे माझे काम असून याकरता पुरुषच आपल्याला पैसे देत असल्याचे स्पष्ट केले. जनतेसमोर ग्राहकाला अपमानित करणे अनेकदा वाद निर्माण होतो. कारण लोक अशा कृत्यांना मान्यता देत नाहीत, परंतु पुरुषांना हे पसंत पडते.