हे एक कोडेही नाही किंवा माणसाचा प्रकारही नाही. सार्वजनिक ठिकाणी स्री आणि पुरुष अशा पाटय़ा असतात. या ठिकाणी या दोघांना एकत्र जाता येत नाही. तेथे दरवाजावर अशा पाटय़ा किंवा चिन्हे लावलेल्या असतात. ज्या जागा स्त्रियांसाठी राखीव असतात तेथील दरवाजावर एका स्रीचा चेहरा रेखाटलेला असतो किंवा केवळ महिलांसाठी असे स्पष्ट लिहिलेले असते. हीच बाब पुरुषांच्या बाबतीतही असते. तथापि, राजस्थानातील एका रेस्टॉरंटमध्ये स्री आणि पुरुष दर्शविणाऱया खुणा इतक्या वेगळय़ा प्रकारच्या आहेत, की त्या पाहणारा मनुष्य गोंधळल्याशिवाय रहात नाही. अनेकांनी या चिन्हांचा फोटो काढून तो सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या रेस्टॉरंटच्या बाथरुम आणि वॉशरुमवर स्रीआणि पुरुष दर्शविणारी जी चिन्हे आहेत, ती भ्रमात टाकणारी असल्याने लोकांच्या आश्चर्याला पारावार रहात नाही. कोणता दरवाजा महिलांसाठी आहे आणि कोणता पुरुषांसाठी आहे, हे प्रथमदर्शनी अजिबात समजत नाही. याबद्दल रेस्टॉरंटच्या मालकाकडे चौकशी केली असता त्याने दिलेला खुलासाही आश्चर्यकारक होता. ज्या चिन्हावरील तिरकी रेषा स्त्रियांची साडी दर्शविते आणि सरळ रेषा ही पुरुषांचे धोतर किंवा लुंगी दर्शविते, असे या मालकांचे म्हणणे आहे.
Previous Articleआता नंबर कोणाचा?
Next Article ‘आयसीसी’कडून इंदूरच्या खेळपट्टीवर ‘खराब’चा शिक्का
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.