वृत्तसंस्था/ पतियाळा
सर्बियातील बेलग्रेड येथे सुरू होणाऱया पुरूषांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी येत्या दोन दिवसांच्या कालावधीत येथे भारतीय पुरूष मुष्टीयोद्धय़ांसाठी सराव शिबिराला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय पुरूष मुष्टीयोद्धय़ांची कामगिरी निराशाजनक झाल्याने फेडरेशनतर्फे अलिकडे प्रशिक्षक वर्गाची चांगलीच हजेरी घेण्यात आली. भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनतर्फे पुरूष आणि महिला मुष्टीयोद्धय़ासाठी येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रशिक्षक वर्ग निश्चित केला जाणार आहे.